शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये सोमवारी भाजपने सरकार स्थापन केली. जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी ११ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी देखील या ठिकाणी पोहोचले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. एयरपोर्टपासून ग्राउंडपर्यंत पीएम मोदींच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी केली होती.
शपथविधी सोहळ्यानंतर हेलिपॅडजवळ परत जात असतांना पंतप्रधान मोदी अचानक थांबले. इंडियन कॉफी हाऊस जवळ त्यांनी अचानक गाडी थांबवल्याने उपस्थित सगळेच हैराण झाले. पंतप्रधान मोदींनी तेथे गाडीतून बाहेर येऊन रस्त्यातच त्यांनी कॉफी प्यायली. पंतप्रधान मोदींना अचानक काही गोष्टींची यावेळी आठवण झाली.
While returning from oath taking ceremony in Shimla, on way to the helipad, PM Modi stopped by the iconic Indian Coffee House at Mall Road. PM often used to spend time here several years ago, when he was in Himachal Pradesh, for party-related work. pic.twitter.com/ibiT4y9i7K
— ANI (@ANI) December 27, 2017
पंतप्रधान मोदी जेव्हा एक कार्यकर्ते होते तेव्हा पक्षाच्या कामासाठी ते जेव्हाही हिमाचल प्रदेशला यायचे तेव्हा ते या ठिकाणी थांबायचे. त्यांनी या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ता असतांना बराच वेळ घालवला होता. त्याच ठिकाणी आज त्यांनी त्याची आठवण झाली. पंतप्रधान झाल्यानंतर ही त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून कॉफी घेतली.