close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

झारखंडच्या 'मॉब लिचिंग'वर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

'राजकीय स्कोअर करण्यासाठी खूप क्षेत्र आहेत. आपल्याला आपली जबाबदारी निभावणं गरजेचं आहे'

Updated: Jun 26, 2019, 04:32 PM IST
झारखंडच्या 'मॉब लिचिंग'वर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

नवी दिल्ली : झारखंडमध्ये एका मुस्लीम तरुणाला मारहाण करत अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चर्चा लोकसभेतही झाली. या प्रकरणात काही सदस्यांनी केंद्राकडे राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केलीय. दुसरीकडे आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात झारखंडमध्ये झालेल्या या मॉब लिचिंग प्रकरणावर जोरदार टीका केली. 

'या घटनेचं दु:ख सगळ्यांनाच आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी. परंतु, संपूर्ण झारखंड राज्याची बदनामी करण्याचा कुणालाही नाही. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्यावर कायदेशीर प्रक्रिया आहे. जगातील दहशतवादी घटनांमध्ये सर्वात जास्त नुकसान चांगल्या दहशतवादानं आणि क्रूर दहशतवादानंच केलंय. राजकीय स्कोअर करण्यासाठी खूप क्षेत्र आहेत. आपल्याला आपली जबाबदारी निभावणं गरजेचं आहे' असं प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत म्हटलंय. 
 
दुसरीकडे, झारखंडमध्ये एका तरुणाची मारहाण करत हत्या केली जाते, यामुळे राज्यातील कायदेव्यवस्था ढासळलीय, असा आरोप काँग्रेसच्या खासदार गीता कोडा यांनी केला. न्याय सुनिश्चित करण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली.