नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी ११ वाजता देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हे भाषण दिल्लीच्या विज्ञान भवनात होणार आहे.
विद्यापीठांना आधीच थेट प्रसारणासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंदांच्या शिकागोमधील जागतिक धार्मिक परिषदेतील भाषणाला १२४ वर्ष पूर्ण झाले आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं हे शतकोत्तर वर्ष आहे या निमित्ताने पंतप्रधान मोदी संवाद सांधणार आहेत.
यंग इंडिया-न्यू इंडियाच्या थीमवर हा कार्यक्रम होत आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगाल सरकारने विद्यापीठांना दिलेला हा आदेश स्वीकारण्यास नकार दिला आहे. भाजपने ममता बॅनर्जी यांचा निर्णय दुर्दैवी आणि लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे.
मोदींनी रविवारी ट्विट करुन म्हटले की, "मी यंग इंडिया न्यू इंडियाच्या थीमखाली विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी उत्सुक आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरणा मिळते. आम्ही उठून जागे होतो आणि स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा होते. देशाला पुढे नेण्यासाठी युवा शक्तीला एक मोठी शक्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.'
1833 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी जागतिक संसदेत (शिकागो) ऐतिहासिक भाषण दिले होते.