पंतप्रधान मोदींच्या शपथविधीस 6 हजार पाहुणे, राष्ट्रपती भवनात तयारी

राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहाची जय्यत तयारी सुरू आहे.

Updated: May 29, 2019, 06:31 PM IST
पंतप्रधान मोदींच्या शपथविधीस 6 हजार पाहुणे, राष्ट्रपती भवनात तयारी title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहाची जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या वेळेप्रमाणे यावेळेसही राष्ट्रपती भवनात मोठ्या संख्येत पाहुणे येत आहेत. यावेळीही शपथ ग्रहण सोहळा फोरकोर्टमध्येच होणार आहे. फोरकोर्टमध्ये 5 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. पण पाहुण्यांच्या यादीत 6 हजार जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. सर्व खासदारांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. 

गेल्यावेळेस ज्या ठिकाणी शपथविधीचा मंच उभारण्यात आला त्याच जागेवर यावेळेसही मंच उभारण्यात आला आहे. पाहुण्यांसाठी हाय टीची व्यवस्था तर विशेष पाहुण्यांसाठी हलक्या डिनरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गेल्यावेळेस शपथ ग्रहण सोहळ्यास 6 वाजता सुरुवात झाली होती. पण वाढत्या गरमीमुळे यावेळेस 7 वाजता सुरुवात होणार आहे. कोणाला निमंत्रण पाठवायचे याची यादी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयाच्या समन्वयातून तयार करण्यात आली आहे. भाजपातर्फे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन एक यादी पाठवण्यात आली आहे. 

गेल्या वेळेस शपथ ग्रहण सोहळ्यासाठीचा मंच राष्ट्रपती भवनाच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूस करण्यात आला होता. जर तुम्ही राष्ट्रपती भवनाकडे पाहत असाल तर स्टेज उजव्या बाजुस दिसेल. पहिल्या रांगेत बाहेरच्या देशातील राष्ट्र प्रमुख तसेच देशातील महत्त्वाच्या पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था आहे.