नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एकूण 57 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रीमंडळात सर्व वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर करण्यात आलं.
1. नरेंद्र मोदी - पंतप्रधान
2. राजनाथ सिंग (कॅबिनेट मंत्री) - संरक्षण मंत्रालय
3. अमित शहा (कॅबिनेट मंत्री) - गृह मंत्रालय
4. नितीन गडकरी (कॅबिनेट मंत्री) - वाहतूक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
5. सदानंद गौडा (कॅबिनेट मंत्री) - केमिकल आणि फर्टीलायझर्स
6. निर्मला सीतारामन (कॅबिनेट मंत्री) - वित्त व कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
7 रामविलास पासवान - ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
8. नरेंद्र सिंग तोमर (कॅबिनेट मंत्री) - कृषी आणि शेतक-यांचे कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालय
9. रविशंकर प्रसाद (कॅबिनेट) - कायदा आणि न्याय, कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती मंत्रालय
10 हरसिमरत कौर बादल (कॅबिनेट) - अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
11. एस जयशंकर (कॅबिनेट मंत्री) - परराष्ट्र मंत्रालय
12 रमेश पोखरियाल निशंक (कॅबिनेट) - मनुष्यबळ विकास मंत्री
13 थावर चंद गहलोत (कॅबिनेट) - सामाजिक न्याय व सक्षमीकरण
14. अर्जुन मुंडा (कॅबिनेट मंत्री) - आदिवासी विकास मंत्रालय
15 स्मृती ईराणी (कॅबिनेट) - महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग मंत्रालय
16 हर्ष वर्धन (कॅबिनेट) - आरोग्य व कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान - भूविज्ञान मंत्रालय
17. प्रकाश जावडेकर (कॅबिनेट) - पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि माहिती व प्रसारण
18 पियुष गोयल (कॅबिनेट) - रेल्वे आणि वाणिज्य मंत्रालय
19. धर्मेंद्र प्रधान (कॅबिनेट) - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्रालय
20, मुख्तार अब्बास नक्वी (कॅबिनेट मंत्री) - अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय
21 प्रल्हाद जोशी (कॅबिनेट) - संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्रालय
22 महेंद्रसिंग नाथ पांडे (कॅबिनेट) - कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
23. अरविंद सावंत (कॅबिनेट) - अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
24 गिरिराज सिंह (कॅबिनेट) - पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय
25 गजेंद्र सिंग शेखावत (कॅबिनेट) - जलशक्ती मंत्रालय
26. संतोष गंगवार (राज्यमंत्री-स्वतंत्र कार्यभार) - श्रम आणि रोजगार मंत्रालय
27. राव इंद्रजीत सिंग (राज्य-स्वतंत्र कार्यभार ) स्टॅटेक्टीक्स आणि इम्पिमेशन आणि नियोजन मंत्रालय
28. श्रीपाद नाईक (राज्यमंत्री-आयसी) - आयुष मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार), संरक्षण मंत्रालय (राज्यमंत्री)
29. जितेंद्र सिंह - राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, तक्रार निवारण, पेन्शन, अणू ऊर्जा, अंतराळ मंत्रालय (राज्यमंत्री)
30 किरण रिजिजू (राज्यमंत्री-स्वतंत्र कार्यभार) - युवक कल्याण आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार), अल्पसंख्याक व्यवहार (राज्यमंत्री)
31 प्रह्लाद सिंग पटेल - संस्कृती आणि पर्यटन (स्वतंत्र कार्यभार)
32 आर. के सिंह - (राज्यमंत्री) ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, (स्वतंत्र कार्यभार) कौशल्य विकास आणि उद्योजकता
33. हरदीप सिंह पुरी (राज्यमंत्री), नागरी विकास आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय (राज्यमंत्री)
34. मनसुख मंडाविया - (राज्यमंत्री) जलवाहतूक (स्वतंत्र कार्यभार), रसायन आणि खते (राज्यमंत्री)
35. फग्गन सिंग कुलस्ते (राज्यमंत्री) स्टील मंत्रालय
36. अश्विनी चौबे (राज्यमंत्री) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री
37. व्ही के सिंग (राज्यमंत्री) - रस्ते वाहतूक आणि राज्य महामार्ग मंत्री
38. कृष्णन पाल, गुज्जर समाजाचे (राज्यमंत्री) - सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण
39. दानवे रावसाहेब दादाराव (राज्यमंत्री) - ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
40. जी किशन रेड्डी (राज्यमंत्री) - गृह राज्यमंत्री
41. पुरुषोत्तम रुपाला (राज्यमंत्री) - कृषी आणि शेतकरी कल्याण राज्य मंत्री
42 रामदास आठवले (राज्यमंत्री) - सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण राज्यमंत्री
43. साध्वी निरंजन ज्योती (राज्यमंत्री) - ग्रामीण विकास राज्यमंत्री
44. बाबुल सुप्रियो (राज्यमंत्री) - पपर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान बदल
45. संजीव कुमार बलियान (राज्य मंत्री) - पशुपालन, दुग्ध आणि मत्स्यपालन राज्य मंत्री
46 संजय धोत्रे (राज्यमंत्री) - मनुष्यबळ विकास, कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
47. अनुराग सिंग ठाकूर (राज्यमंत्री) - वित्त आणि कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय राज्यमंत्री
48. सुरेश अंगडी (राज्यमंत्री) - रेल्वे मंत्रालय राज्यमंत्री
49. नित्यानंद राय (राज्यमंत्री) - गृह राज्यमंत्री
50. व्ही मुरलीधरन (राज्यमंत्री) - परराष्ट्र मंत्रालय, संसदीय कामकाज राज्यमंत्री
51. रेणुका सिंग (राज्यमंत्री) - आदिवासी विकास राज्यमंत्री
52 सोम प्रकाश (राज्यमंत्री) - वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री
53. रामेश्वर तेली (राज्यमंत्री) - अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
54. प्रताप चंद्र सारंगी (राज्यमंत्री) - सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, पशुपालन, दुग्ध आणि मत्स्यपालन राज्यमंत्री
55 कैलाश चौधरी (राज्यमंत्री) - कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
56. देबश्री चौधरी (राज्यमंत्री) - महिला आणि बालकल्याण विकास राज्यमंत्री
57 अर्जुन राम मेघवाल (राज्यमंत्री) - संसदीय कामकाज, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग राज्यमंत्री
58. रतन लाल कटारिया (राज्यमंत्री) - जलशक्ती आणि सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री