नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच रशियाच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले. मात्र, या दौऱ्यात घडलेल्या एका प्रसंगाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. रशियाच्या इंडिया बिझनेस पॅव्हेलियनमध्ये एका फोटो सेशनचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी पंतप्रधानांसाठी सोफा आणि इतरांसाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, पंतप्रधानांनी आपण सर्वांसारखेच असून आपल्यासाठी वेगळी व्यवस्था का? असा प्रश्न करत वेगळा सोफा नाकारला. यानंतर ते खुर्चीवर स्थानापन्न झाले.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. रशियात त्यांच्यासाठी केलेली विशेष व्यवस्था नाकारून त्यांनी सामान्य लोकांप्रमाणे खुर्चीत बसणे पसंत केले. हा किती चांगला आदर्श आहे. त्यांचा साधेपणा शब्दांत मांडणे शक्यच नाही, असे पीयूष गोयल यांनी म्हटले.
यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या प्रसंगाविषयी आपापली मते मांडली. आपल्याकडे एक शांत आणि विनम्र पंतप्रधान आहे. मोदींच्या याच साधेपणामुळे ते आज जगातील शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत. चांगल्या लोकांशी ते नेहमीच मृदूपणे वागतात. मात्र, भारताविषयी असुया बाळगणाऱ्यांविरोधात ते मोदी कठोर भूमिका घेतात. देशासाठी काय चांगले आहे, हे त्यांना पक्के ठाऊक असल्याची प्रतिक्रिया एका युजरने दिली.
PM @NarendraModi जी की सरलता का उदाहरण आज पुनः देखने को मिला, उन्होंने रूस में अपने लिए की गई विशेष व्यवस्था को हटवा कर अन्य लोगों के साथ सामान्य कुर्सी पर बैठने की इच्छा जाहिर की। pic.twitter.com/6Rn7eHid6N
— Piyush Goyal (@PiyushGoyal) September 5, 2019