नवी दिल्ली : नित्यनियमानं आणि निर्धारित वेळेत कर भरणाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी एक खास भेट घेऊन आले आहेत. गुरुवारी याबाबतची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 'पारदर्शी कराधान- इमानदार का सन्मान' असं या योजनेचं नाव असल्याचं कळत आहेत.
व्हिडिओ क़ॉन्फरन्सच्या माध्यमातून त्याचा शुभारंभ होणार असून, यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अनुराग सिंह ठाकूरसुद्धा उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यासंबंधीच्याच एका पत्रकात म्हटलं गेलं आहे की, प्राप्तीकर विभागाती अधिकारी, पदाधिकारी किंवा विविध अर्थ विभाग, व्यापार संघ, किंवा चार्टर्ड अकाऊंटंट संघांसोबतच इतरही करदाते या आयोजनात सहभागी होतील.
केंद्राच्यात सीबीडीटीनं हल्लीच्याच काही वर्षांमध्ये थेट करांमध्ये अनेक मोठ्या करांच्या सुधारणाही जोडल्या आहेत. मागील वर्षी कॉर्पोरेट कराचा दर ३० टक्क्यांहून कमी करून २२ टक्के इतका करण्यात आला. प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकानुसार कराच्या प्रमाणात कपात करुन थेट करप्रणाली अधिक सोपी करण्यावर भर देण्यात आला आहे.
कर विभागाच्या कामकाजामध्ये अधिक दक्षता आणि पारदर्शकता आणण्यासाठी हे नवं पाऊल उचलण्यात आलं आहे. डिजिटल व्यवहार, करदात्यांच्या तक्रारी यांवरही या माध्यमातून भर देण्यात आला आहे.