इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी, सोनिया गांधींनी वाहिली श्रद्धांजली

इंदिरा गांधी यांची १०२वी जयंती...

Updated: Nov 19, 2019, 11:21 AM IST
इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी, सोनिया गांधींनी वाहिली श्रद्धांजली
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज १०२वी जयंती आहे. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहली.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमिद अंन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीसह इतर नेत्यांनी शक्तीस्थळावर इंदिरा गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली.

इंदिरा गांधी १९६६ ते १९७७ पर्यंत आणि पुन्हा १९८० ते १९८४ पर्यंत देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ मध्ये अलाहबाद येथे झाला. 

  

इंदिरा गांधी त्यांच्या काही निर्णयांमुळे त्या वादातही राहिल्या. जून १९८४ मध्ये अमृतसरच्या स्वर्ण मंदिरातील कारवाईही त्यापैकीच एक होती. त्यांच्या शिख अंगरक्षकाने त्यांना गोळ्या झाडून ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती.