पोटच्या लेकरांना आणि बायकोला पाजलं विष, नंतर स्वतः घेतला गळफास; एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूने औरंगाबाद हादरले

 दिल्लीच्या पलावलमध्ये दिल्ली - आग्रा नॅशनल हायवेजवळ औरंगाबादमधील एका घरात एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांसह पाच जणांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे.

Updated: Sep 30, 2021, 12:48 PM IST
पोटच्या लेकरांना आणि बायकोला पाजलं विष, नंतर स्वतः घेतला गळफास; एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूने औरंगाबाद हादरले

नवी दिल्ली : दिल्लीच्या पलावलमध्ये दिल्ली - आग्रा नॅशनल हायवेजवळ औरंगाबादमधील एका घरात एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांसह पाच जणांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

दिल्ली जवळील पलवलमध्ये  एकाच कुंटुंबातील 5 जणांच्या हत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या कुंटुंबांचे सर्व नातलग मित्रांशी चांगले संबध होते. सर्वांशी हसणे खेळणे होते. गावांतील लोकांमध्ये मिसळणे सर्वांशी आनंदाने राहणाऱ्या कुटुंबातील पाचही जणांच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. घटनेच्या आधीच्या रात्रीसुद्धा कुमार कुंटुंबियांमध्ये खळखळुन हसण्याचा आवाज येत होता.

औरंगाबामधील नरेश कुमार यांना सकाळी झोपेतून उठवण्यासाठी आवाज देण्यात आला. घराच्या आतून कोणाचाही आवाज येत नसल्याने नरेशच्या वडीलांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना नरेशचा मृतदेह पंख्यावर लटकलेला दिसला. आणि नरेशची पत्नी आरती, मुलगी वर्षा (8), भाची रविता(11) , मुलगा संजय (10)यांचे मृतदेह पलंगावर आढळून आले. आजुबाजूच्यांना बोलावून नरेशचा मृतदेह खाली आणण्यात आला.

घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची आत्महत्येची चिठ्ठी दिसून आलेली नाही. प्राथमिक चौकशीत नरेशने आधी आपल्या पत्नीला, दोन्ही मुलांना आणि भाचीला विष पाजले. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. या घटनेत कोणत्याही बाहेरील व्यक्तीचा संबध नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
तसेच नरेशला व्यवसायात मोठा तोटा आणि नुकसान झाल्याच्या तणावातून त्याने आत्महत्या केली असावी असा मित्रमंडळी आणि नातेवाईकांचा अंदाज आहे.