केक खाताच मुलीचा मृत्यू, पोलिसांना केकचे दुकान सापडलेच नाही; पण, कुटुंबीयांनी शोधून काढलेच

Girl Died After Eating Cake: आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केक खाल्ल्यानंतर 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 1, 2024, 12:46 PM IST
केक खाताच मुलीचा मृत्यू, पोलिसांना केकचे दुकान सापडलेच नाही; पण, कुटुंबीयांनी शोधून काढलेच title=
Police arrested bakery employees after girl died due to eating cake

Girl Died After Eating Cake: पंजाबच्या पटियालामध्ये केक खाल्ल्याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी मालकासह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. न्यू इंडिया बेकरीचे मॅनेजर रणजीत, कर्मचारी पवन आणि विजय यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवर ऑनलाइन फुड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने ही दुखः व्यक्त करुन या बेकरीला फुड लिस्टमधून बाहेर केले आहे. तसंच, या प्रकरणात आता फसवणुकीचा प्रकारही समोर आला आहे.

पटियालाच्या अमन नगर परिसरात राहणाऱ्या 10 वर्षीय मानवीचा 24 मार्च रोजी वाढदिवस होता. या दिवशी तिची आई काजलने झोमॅटोवरुन कान्हा फर्ममधून केक मागवला होता. रात्री सगळ्यांनी वाढदिवस साजरा केला आणि केकदेखील खाल्ला. केक खाल्ल्यानंतर मानवीची तब्येत बिघडली. तसंच, घरातील इतर सदस्यांनाही उलट्या होऊ लागल्या. मात्र मानवीची तब्येत अधिक बिघडली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मानवीच्या कुटुंबीयांनी उरलेला केक फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. जेणेकरुन त्याची तपासणी करता येऊ शकते. 

मानवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी केक पाठवणाऱ्या त्या कान्हा फर्मविरोधात तक्रार दाखल केली. मात्र जेव्हा पोलिसांनी याची चौकशी केली तेव्हा समोर आले की तिथे त्या नावाचे कोणतेच दुकान नाहीये. हा एक फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आले. त्यानंतर मानवीच्या कुटुंबीयांनी 30 मार्च रोजी पुन्हा एकदा झोमॅटोवरुन कान्हा फर्ममधून केक मागवला. तेव्हा केकची डिलिव्हरी देणाऱ्या एजंटला त्यांनी पकडले. 

डिलिव्हरी एजंटसोबत जेव्हा पोलिस त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा समोर आले की कान्हा फर्म बनावट होते. आणि केक न्यू इंडिया बेकरीतून पाठवण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू इंडिया बेकरीचे मालकानेच कान्हा फर्म नावाने आणखी एक बेकरी रजिस्टर केली होती आणि झोमॅटोवर डिलिव्हरीसाठी या नावाचा वापर करत होता. 

वाढदिवशीच गमावले प्राण, ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाताच 10 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

मानवीच्या मृत्यूनंतर सिटी एसपी यांनी म्हटलं आहे की, आरोपींविरोधात आयपीसी कलम 304 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकरीच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलं आहे. तर, बेकरीचा मालक फरार असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.  पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसंच, घरातून केकचे तुकडे एफएसएल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.