मुंबई : लग्नानंतर बऱ्याच महिलांचे किंवा पुरुषांचे बाहेर अफेअर असल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असाल. जेव्हा दोघांपैकी एक जरी जोडीदार असा पाऊल टाकतो तेव्हा, त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. मग घरी भांडणं, तंटे होऊ लागतात. बऱ्याचदा होतं असं की, आपल्या नवऱ्याचे बाहेर परस्त्री सोबत काही संबंधं असले, तर ती बऱ्याचदा गप्पं बसते. परंतु एका पोलिस वाल्याच्या बायकोनं केलं त्याला तोड नाही.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पोलीस हवालदारासोबत असाच एक प्रकार घडला. खरंतर येथे पोलिस वाल्याला त्याच्या गर्लफ्रेंडनं हॉटेलच्या खोलीत भेटायला बोलावलं, परंतु तेथे गेल्यावर त्यानं आपल्या बायकोलाचं पाहिलं.
खरंतर आपल्या नवऱ्याला रंगेहातो पकडण्यासाठी पोलिसवाल्याच्या बायकोनं एक प्लान आखला. तिने फेसबुकवर एक फेक आयडी तयार केला. जेथून तिने आपल्या नवऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिच्या नवऱ्यानं जेव्हा ही रिक्वेस्ट एक्सेप्ट केली, तेव्हापासून खरी कहानी सुरु झाली.
जेव्हा त्या दोघांमध्ये मैत्री झाली, तेव्हा त्यांचं बोलणं हळूहळू प्रेम आणि किसपर्यंत पोहोचलं. त्यानंतर एक दिवस त्यांचं बाहेर हॉटेलच्या खोलीत भेटायचं ठरलं, ज्यानंतर तो पोलिसवाला नवरा जेव्हा हॉटेलच्या खोलीत आला, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
कारण जिला तो त्याची नवीन गर्लफ्रेंड समजत होता. ती त्याची बायकोचं निघाली, बायकोला समोर पाहून पोलिसवाला पूर्ता हादरला.
ज्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार देखील दाखल केली. एवढेच नाही तर महिलेनं हे देखील सांगितलं की, लग्नाच्या काहीच दिवसात माझ्या नवऱ्यानं मला मारझोड करण्यास सुरुवात केली.
पीडितेच्या आरोपावरून इंदूर जिल्हा न्यायालयाने आरोपीविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सोमवारी पतीला जेवणाचा खर्च म्हणून २ लाख रुपये, तसेच महिलेच्या देखभालीसाठी दरमहा ७ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.