हनीप्रीत दिल्लीमध्येच, पोलिसांकडून शोध सुरु

साध्वींवर बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या शिक्षेनंतर त्याची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. ती नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा देखील अनेक दिवसांपासून होती.

Updated: Sep 26, 2017, 04:42 PM IST
हनीप्रीत दिल्लीमध्येच, पोलिसांकडून शोध सुरु title=

नवी दिल्ली : साध्वींवर बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या शिक्षेनंतर त्याची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. ती नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा देखील अनेक दिवसांपासून होती.

हनीप्रीतचा शोध आता सुरु झाला आहे. हनीप्रीत ही दिल्लीमध्येच असल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे. हनीप्रीतचा वकील प्रदीप अरीया यांनी सांगितलं की जामीन अर्जावर सही करण्यासाठी ती माझाकडे आली होती. आज ही याचिक कोर्टात दाखल केली जाणार आहे.

हनीप्रीतच्या वकिलाने सांगितलं की, 'सोमवारी हनीप्रीत दिल्लीमध्ये त्यांच्या कार्यालयात आली होती. दिल्लीतील त्यांच्या ऑफिसमध्ये तिने जामीन अर्जावर सही केली. त्यामुळे हनीप्रीत ही दिल्लीतच असल्याची शंका पोलिसांना आहे. पोलिसांनी दिल्लीमध्ये हनीप्रीतचा शोध सुरु केला आहे.