बजेट 2018 : दिग्गजांनी जेटलींच्या बजेटवर दिल्या या प्रतिक्रिया

मोदी सरकारच्या काळातील हे बजेट अर्थमंत्री अरूण जेटलींनी सादर केली. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 1, 2018, 07:35 PM IST
बजेट 2018 : दिग्गजांनी जेटलींच्या बजेटवर दिल्या या प्रतिक्रिया  title=

मुंबई : मोदी सरकारच्या काळातील हे बजेट अर्थमंत्री अरूण जेटलींनी सादर केली. 

या सदरात जेटलींनी शेतकरी, गरिबांसाठी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र नोकरदार वर्गाला कोणतीच दिलासा देणारी बाब या बजेटमध्ये सादर झाली नाही. जेटलींनी इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताच बदल केला नाही. 

या बजेटवर अनेकांनी अरूण जेटलींचं कौतुक केलं तर काहींनी निराशा व्यक्त केली. पाहूयात अशाच काही प्रतिक्रिया 

मोदींनी केलं कौतुक 

बजेट सादर झाल्यानंतर मोदींनी देशाला संबोधित करताना म्हटले की, हे बजेट आर्थिक विकासाला गती देणार आहे. यामध्ये सर्व क्षेत्रांचा समाविष्ट आहे. देशाला आणखी मजबूत करणारं हे बजेट आहे. 

सरकारची मोठी गोष्ट - नीतीश कुमार 

बजेटवर आपली प्रतिक्रिया देताना बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सांगितले की, शिक्षा, स्वास्थ आणि शेतीबाबत मोठी घोषणा केली. 10 करोड गरीब परिवारातील लोकांना राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा योजनेची घोषणा केली. सरकारला मी शुभेच्छा देतो असं ते म्हणाले. 

हेच का ते अच्छे दिन 

लालू यादव यांनी म्हटले की, अच्छे दिन हेच आहेत का? शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगार लोकांसाठी या बजेटमध्ये काहीच नाही.