पॉप गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू

एका कार्यक्रमासाठी जात असताना अपघात

Updated: Jan 30, 2019, 11:25 AM IST
पॉप गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मथुरा जनपद येथे मंगळवारी रात्री यमुना एक्सप्रेस-वेवर एका अपघातात दिल्लीची प्रसिद्ध पॉप गायिका शिवानी भाटिया हिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिचा पती निखिल भाटिया गंभीररित्या जखमी झाला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, पती-पत्नी सोमवारी आग्रा येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना कार दुर्घटना झाली. सुरीर कोतवाली जवळ हा अपघात झाला. त्यांची कार एका दुसऱ्या गाडीला धडकली. ज्यामध्ये कारचा चुराडा झाला.

मूळची बिहारच्या सीतामढी जनपदची राहणारी शिवानी भाटिया मागील काही वर्षांपासून दिल्लीच्या लाजपतनगर येथे पती निखिल भाटियासोबत राहत होती. पॉप गायिका म्हणून तिने खूप नाव कमवलं होतं. सोमवारी आग्रा येथे तिचा एक शो होणार होता. त्यासाठीच ती निघाली होती. शिवानीचा पती निखिल भाटिया हेच गाडी चालवत होते.

 शिवानी भाटियाचं गाजलेलं गाणं