धक्कादायक! प्रवेशपत्रिकेवर विद्यार्थ्यांच्या ऐवजी छापले अश्लील फोटो

फोटोच्या ऐवजी अश्लील फोटो छापून आल्याचा धक्कादायक प्रकार

shailesh musale Updated: Apr 9, 2018, 06:08 PM IST
धक्कादायक! प्रवेशपत्रिकेवर विद्यार्थ्यांच्या ऐवजी छापले अश्लील फोटो title=

नवी दिल्ली : परीक्षेच्या प्रवेश पत्रिकेवर विद्यार्थ्यांच्या फोटोच्या ऐवजी अश्लील फोटो छापून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा शिक्षण विभागाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. दरभंगामधील ललित नारायण मिथिला विश्वविद्यालयातील हा प्रकार आहे. हे हॉल तिकीट सध्या सोशल मीडिय़ावर व्हायरल होतं आहे.

हा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा एका विद्यार्थ्याने इंटरनेटवरुन आपलं प्रवेशपत्र डाऊनलोड केलं. विद्यार्थी एसएमजे कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. ही परीक्षा 10 एप्रिल 2018 पासून सुरु होणार आहे.

Viral: University Issues Admit Card for Lord Ganesha

काही दिवसांपूर्वी गणेशाचा फोटो असलेला प्रवेशपत्र व्हायरल झालं होतं.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन अर्ज करतांना मिळालेल्या पावतीवर विद्यार्थ्याची सही आणि फोटो बरोबर होता. पण प्रवेशपत्र आलं तेव्हा मात्र त्याच्यावरील फोटो अश्लील होता. या घटनेची माहिती मिळताच एलएनएमयू परीक्षा विभागात एकच खळबळ उडाली. त्यानंतर संबंधित विभाग हरकतीत आला.