भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता, दिल्लीतील महत्त्वाची ठिकाणं निशान्यावर

गुप्तचर विभाग अफगाणिस्तानातील परिस्थितीनंतर सतर्क झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा यानंतर अलर्टवर आहेत.

Updated: Sep 4, 2021, 02:51 PM IST
भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता, दिल्लीतील महत्त्वाची ठिकाणं निशान्यावर title=

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील परिस्थिती आज जगासमोर आहे. देशाची राजधानी दिल्ली (Delhi) वर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. दिल्लीत इस्राईलचे (Israel) नागरिक दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. दहशतवादी पुन्हा एकदा यहूदी लोकांना लक्ष्य करु शकतात. गुप्तचर विभागाने अलर्ट दिला आहे. Jewish Holiday 6 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 

गुप्तचर विभाग अफगाणिस्तानातील परिस्थितीनंतर सतर्क झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा यानंतर अलर्टवर आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला करु शकतात. जे इस्राईलशी संबंधित आहेत. 

दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. याआधी देखील यहूदी हे नेहमीच दहशतवाद्यांच्या निशान्यावर राहिल्या आहेत. जानेवारी 2021 मध्ये इस्राईल एंबेसी जवळ बॉम्बस्फोट झाला होता. पण यामध्ये कोणीही जखमी झालं नव्हतं. याशिवाय 13 फेब्रुवारी 2012 मध्ये इस्राईलच्या दुतावासाजवळ बॉम्ब स्फोट झाला होता.