जीएसटीमध्ये आणखी काही बदल होण्याचे संकेत

जीएसटीच्या २८ टक्के कराच्या स्लॅबमधून जवळपास १७८ वस्तू वगळल्यानंतर मोदी सरकार आता पुन्हा एकदा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. 

Updated: Nov 14, 2017, 11:05 AM IST
जीएसटीमध्ये आणखी काही बदल होण्याचे संकेत title=

नवी दिल्ली : जीएसटीच्या २८ टक्के कराच्या स्लॅबमधून जवळपास १७८ वस्तू वगळल्यानंतर मोदी सरकार आता पुन्हा एकदा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीमध्ये काही बदल करण्याचे संकेत दिले आहे. जेटलींनी म्हटलं की, 'जीएसटी रेटमध्ये कमी करण्याची आवश्यकता होती. आम्ही ४ महिन्यात २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये बदल केले आहेत.

टॅक्स दरांमध्ये होऊ शकतात बदल

जीएसटीला १ जुलैला लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर यामध्ये अनेक त्रुटी दूर करण्यासाठी जीएसटी काउंसिलची प्रत्येक महिन्यात बैठका झाल्या. त्यांनी म्हटलं की, भविष्यात टॅक्स दरांमध्ये बदल सरकारचे राजस्व पाहून केले जातील. प्रक्रियाबाबतीत ही काही बदल होऊ शकतात.

 ५ टक्के आणि १२ टक्के स्लॅबवर करणार फोकस

सूत्रांच्या अनुसार, पुढच्या टप्प्यात ५ टक्के आणि १२ टक्के स्लॅबवर फोकस करण्यात येईल. यामध्ये एकूण २५० वस्तू येतात. अरुण जेटली जीएसटी काउंसिलचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी म्हटल की, 'आम्ही मार्केटमधील सत्यता पाहून निर्णय घेऊ. जीएसटी काऊंसिलचं असं मत आहे की, 'वस्तूंच्या दरांमध्ये जे बदल झाले ते ग्राहकांच्या फायद्याचे ठरले आहे.'