मुंबई : लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत पोस्ट ऑफिसकडे बचतीचे प्लॅन आहेत. यातील सर्वोत्तम 7 योजनांबाबत माहिती आपण घेणार आहोत.
1 नॅशनल सेविंग सर्टिफिकेट
पोस्ट ऑफिस नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक केल्यास 6.8 टक्के व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर अधिनियम कलम 80 सी अंतर्गत करांत सूट मिळते.
2 पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉजिट
पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉजिट मध्ये विशिष्ठ अवधीसाठी पैसे गुंतवल्यास निक्कीच चांगला परतावा मिळतो. या योजनेचा लाभ घेतल्यास आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत टॅक्स सूटचा फायदा घेता येतो.
3 नॅशनल पेन्शन स्किम
NPS एक निवृत्ती योजना आहे. या योजनेला केंद्र सरकारने सुरू केले होते. आयकर अधिनियम कलम 80 अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही कर लागत नाही.
4 सुकन्या समृद्धी योजना
आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनेअंतर्गत पालकांना जमा रकमेवर 7.6 टक्के परतावा मिळत आहे. या योजनेअंतर्गतही करांमध्ये सूट मिळते.
5 किसान विकास पत्र
छोट्या स्तरावर गुंतवणूक करण्यासाठी ही योजना चांगला पर्याय आहे. या बचतीच्या योजनेवर 6.9 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत पैसे गुंतवल्याने करांतून सवलतही मिळते. तसेच 113 महिन्यांमद्ये हा फंड मॅच्युअर होतो. सध्या या योजनेचा मॅच्युअरीटी पिरीअड 124 महिने इतका करण्यात आला आहे.
6 वरिष्ठ नागरिक बचत योजना
पोस्ट ऑफिस वरिष्ठ बचत योजना वरिष्ट नागरीकांना स्पेशल सुविधा देते. या योजनेअंतर्गत 7.4 टक्क्यांचे व्याज मिळते. या योजनेत पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. तसेच 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
7 पब्लिक प्रोव्हिडंट फंड
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानले जाते. PPF 15 वर्षाच्या लॉंग टर्म अवधीसाठी गुंतवणूक योजना आहे. या योजनेअंतर्गतही करांमध्ये सूट मिळू शकते.