Post Office च्या या योजनांमधून पैशांचा पाऊस पडेल! इतक्या वर्षांत पैसे दुप्पट, जाणून घ्या

Post Office Saving Schemes: सप्टेंबरच्या तिमाहीत सरकारने लहान बचत योजनांच्या व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे आहे.

Updated: Jul 2, 2021, 01:42 PM IST
Post Office च्या या योजनांमधून पैशांचा पाऊस पडेल! इतक्या वर्षांत पैसे दुप्पट, जाणून घ्या title=

मुंबई : Post Office Saving Schemes: सप्टेंबरच्या तिमाहीत सरकारने लहान बचत योजनांच्या व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) अनेक बचत योजना सुरु आहेत. या योजनांमधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे यावर शासकीय हमी आहे. म्हणजेच तुमचे पैसे बुडणार नाहीत. आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस आणि त्यांच्या सर्व बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, आम्ही तुम्हाला सांगतो की, या योजनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर किती वेळानंतर तुमचे पैसे दुप्पट होतील.

1. Post Office टाइम डिपॉजिट 

1 वर्षापासून 3 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटवर (TD) सध्या 5.5 टक्के व्याज मिळत आहे. आपण यात गुंतवणूक केल्यास सुमारे 13 वर्षांत आपले पैसे दुप्पट होतील. त्याचप्रमाणे 13 वर्षांच्या ठेवीवर तुम्हाला 7.7 टक्के व्याज मिळेल. या व्याजदरासह पैशांची गुंतवणूक केली गेली असेल तर सुमारे 10.75 वर्षांत आपले पैसे दुप्पट होतील.

2. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक खाते

जर आपण आपले पैसे पोस्ट ऑफिसच्या (Post Office) बचत खात्यात ठेवले तर पैसे दुप्पट होण्यासाठी आपल्याला बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल. कारण हे वार्षिक 4.0 टक्के व्याज देते, म्हणजेच 18 वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील.

3. पोस्ट ऑफिस रिकर्निंग डिपॉझिट

सध्या पोस्ट ऑफिस रिकर्निंग डिपॉझिटवर (RD)तुम्हाला 5.8 टक्के व्याज दिले जात आहे, म्हणून जर या व्याज दरावर पैसे गुंतविले गेले तर ते जवळजवळ 12.41 वर्षांत दुप्पट होईल.

4. Post Office मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिस  (Post Office) मासिक उत्पन्न योजनावर (MIS) सध्या 6..6 टक्के व्याज मिळत आहे, जर या व्याज दरावर पैसे गुंतविले गेले तर ते अंदाजे 10.91 वर्षांत दुप्पट होईल.

5. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनवर (एससीएसएस)  सध्या 7.4 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत आपले पैसे सुमारे 9.73 वर्षांत दुप्पट होतील.

6. पोस्ट ऑफिस पीपीएफ (Post Office PPF)

पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षाच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. म्हणजेच या दराने आपले पैसे दुप्पट करण्यास सुमारे 10.14 वर्षे लागतील.

7. Post Office सुकन्या समृद्धी खाते

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजनेत सध्या सर्वाधिक 7.6 टक्के व्याज दर मिळत आहे. मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या या योजनेत, पैसे दुप्पट होण्यास सुमारे 9.47 वर्षे लागतील.

8. Post Office राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

सध्या पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर (एनएससी) 6.8 टक्के व्याज दिले जात आहे. ही-वर्षिक बचत योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीद्वारे आयकरसुद्धा वाचवता येतो. या व्याजदरावर पैशांची गुंतवणूक केल्यास ती सुमारे 10.59 वर्षांत दुप्पट होईल.