मुंबई : PPF Tax Saving:सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF हे गुंतवणुकीचा एक जबरदस्त पर्याय आहे. ज्यामुळे चांगला परतावा मिळतो. ही E-E-E श्रेणीमध्ये येणारी गुंतवणूक आहे. म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वता रकमेवर कोणताही कर नाही. पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत उपलब्ध आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूकीवर लोकांचा विश्वास आहे. पण पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला जास्त फायदा होईल.
कर तज्ज्ञांच्या मते, जर गुंतवणूकदार विवाहित असेल तर तो आपल्या पत्नी किंवा पतीच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतो आणि त्यात स्वतंत्रपणे 1.5 लाख रुपये गुंतवू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, जोडीदाराच्या नावाने पीपीएफ खाते उघडल्यास गुंतवणूकदाराच्या पीपीएफ गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट होईल. तरीही आयकर सूट मर्यादा 1.5 लाख रुपये असेल. तुम्हाला 1.5 लाख आयकर सवलत मिळाली असली तरी त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
PPF गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट होऊन 3 लाख रुपये होईल. E-E-E श्रेणीमध्ये असल्याने, गुंतवणूकदाराला PPF च्या व्याज आणि परिपक्वता रकमेवर कर सूट मिळते.
क्लबिंग तरतुदींचा कोणताही परिणाम होत नाही. PPF चा व्याज दर 7.1% वर निश्चित करण्यात आला आहे.