प्रशांत किशोर यांची सोनिया, राहुल, प्रियंका गांधी यांच्याशी बंद दाराआड चर्चा, सुरु आहे मोठी तयारी

राजकीय निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस (Congress) नेते सोनिया गांधी (Sonia Gandhi) , राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली.  

Updated: Jul 14, 2021, 03:23 PM IST
प्रशांत किशोर यांची सोनिया, राहुल, प्रियंका गांधी यांच्याशी बंद दाराआड चर्चा, सुरु आहे मोठी तयारी title=
संग्रहित छाया

मुंबई : राजकीय निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस (Congress) नेते सोनिया गांधी (Sonia Gandhi) , राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. याआधी प्रशांत किशोर यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर पवार यांची दिल्लीतही भेट झाली. पवार यांच्या  भेटीआधी प्रशांत यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या भेटीनंतर अनेक तर्क लढविले जात आहे.

प्रशांत काँग्रेसबरोबर मिशन 2024 च्या तयारीसाठी काम करीत आहे का? प्रशांत कुमार यांनी काँग्रेस हाय कमांडशी झालेल्या बैठकीनंतर असे अनुमान वर्तविले जात आहे की, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी ते एक मोठा आराखडा तयार करीत आहेत. त्यासोबत असेही म्हटले जात आहे की या बैठकीत पंजाब काँग्रेसचे दोन प्रमुख नेते सीएम अमरिंदर सिंग आणि नवजोतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांबद्दलही चर्चा झाली.

दरम्यान, काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. सोनिया गांधी यांना स्थायी अध्यक्ष बनवलं जाण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणुकीची शक्यता आहे. तर राहुल गांधी लोकसभेत काँग्रेसचे नेते, होऊ शकतात का, याचीही चाचपणी होत आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांचा राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. मात्र, सध्या अधीर रंजन चौधरी लोकसभेत काँग्रेसचे नेते आहेत.

दिल्लीतील खासदारांच्या निवासस्थानी बैठक झाली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्याशी या नेत्यांची बैठक दिल्लीतील काँग्रेसच्या खासदाराच्या निवासस्थानी झाली होती, तिथे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बैठकीला हजर होते. त्याचवेळी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीला उपस्थित राहिल्या.

लोकसभा निवडणुकीसाठी मोठी योजना तयार?

सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक पुढच्या वर्षी पंजाब किंवा उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबद्दल नव्हती आणि ती मोठ्या योजनेच्या तयारीचा भाग असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 2021 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी करण्यात प्रशांत कुमार महत्वाची भूमिका बजावू शकतात, हे या संकेत आहेत.

प्रशांत किशोर यांची शरद पवारांशी महत्त्वपूर्ण बैठक 

यापूर्वी प्रशांत किशोर यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. यानंतर लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या आघाडीची चर्चा झालेल्याचे बोलले जात आहे.