नवी दिल्ली : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राजकीय घडामोडींच्या दृष्टिकोनातून ही बैठक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झाली. राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यात ही पहिली वैयक्तिक बैठक आहे अशी चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रियंका गांधी आणि केसी वेणुगोपाल आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत हेही या बैठकीत उपस्थित होते.
अशी शक्यता वर्तविली जात आहे की राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीत पंजाब निवडणुका बाबत चर्चा होऊ शकते. काही महिन्यांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांची प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली आणि त्यानंतर किशोर यांनी आमदार आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही घेतली.
यापूर्वी प्रशांत किशोर यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. प्रशांत किशोरी यांनी शरद पवार यांच्याशी दोन बैठका केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बंगाल निवडणुकीत प्रशांत किशोर ममता बॅनर्जी यांच्यासाठी रणनीतिकारही होते.