नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. फक्त देशातचं नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना या धोकादायक विषाणूने अनेकांचे प्राण घेतले आहे. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सर्वच देश लसीच्या शोधात आहे. काही देशांमध्ये लसीकरणाची सुरूवात देखील झाली. तर महाराष्ट्रात देखील शनिवारी काही ठिकाणी लसीकरणाच्या रंगीत तालिमेला सुरूवात झाली. राज्यात पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ड्रायरन होत आहे.
दरम्यान देशात लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ते म्हणाले, 'निवडणुकीसाठीच्या बुथ लेव्हरवर लसीकरण मोहीम आधारित असणार आहे. कुशल कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची प्रचंड प्रक्रिया सुरू असल्याचं देखील ते म्हणले.
त्याचप्रमाणे 719 जिल्ह्यांमधील 57 हजार स्वयेंसेवकांचं प्रशिक्षण पू्र्ण झालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. लसीकरण करणाऱ्या 96 हजार कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. शिवाय रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशन सरकारच्या कोविन ऍपवरून सुरू असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
लसीकरणाची जय्यत तयारी
- लसीकरणासाठी विशेष केंद्र तयार करण्यात आले आहेत.
- प्रत्येक केंदामध्ये वेटींग रूम, लसीकरण, पहाणी कक्ष असणार आहे.
- प्रत्येक लाभार्थीमागे 5 जनांची टीम असणार आहे.
- शिवाय राखीव कर्मंचाऱ्यांची टीम देखील तैनात करण्यात आली आहे.
- लसीकरणासाठी सरकारचे कोविन ऍप देखील आहे.
- लसीकरणानंतर काही रिऍक्शन आल्यास नोंदणीचा सोय करण्यात आली आहे.