President Election: भाजपच्या उमेदवाराला या 4 पक्षांकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत

एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Updated: Jun 22, 2022, 06:26 PM IST
President Election: भाजपच्या उमेदवाराला या 4 पक्षांकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत title=

मुंबई : एनडीएने मंगळवारी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर भाजपला दोन पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. झारखंडचा सत्ताधारी पक्ष JMM देखील आदिवासींच्या नावाने पाठिंबा देऊ शकतो. द्रौपदी मुर्मू ही संथाल जमातीतून येतात. ज्यांची झारखंडमध्ये मोठी लोकसंख्या आहे. भाजपकडून द्रौपदी मुर्मूच्या घोषणेनंतर ओडिशात सरकारमध्ये असलेल्या बीजेडी आणि आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे. 

NDA मधील भाजपचा मित्रपक्ष JDU ही द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक सहज जिंकण्याच्या स्थितीत एनडीए आली आहे.

एनडीएच्या बाहेर वायएसआर काँग्रेस पक्ष आणि ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुर्मू यांचे ट्विटरवरील संदेशात अभिनंदन करताना वायएसआर काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते व्ही. विजयसाई रेड्डी म्हणाले, "मुर्मू यांना एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी बरोबर आहेत की मुर्मू आपल्या देशाचे महान राष्ट्रपती सिद्ध होतील.'

वायएसआर काँग्रेसचे ही पाठिंबा देण्याचे संकेत

वायएसआर काँग्रेसचे 175 सदस्यांच्या आंध्र प्रदेश विधानसभेत 150 आणि विधान परिषदेत 33 सदस्य आहेत. लोकसभेत 25 पैकी 22 आणि राज्यसभेत 11 पैकी 6 सदस्य आहेत. अशा स्थितीत त्यांच्या बाजूने पाठिंबा महत्त्वाचा असून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा विजय निश्चित होणार आहे. एनडीएकडे एकूण 10.79 लाख मतांपैकी 5,26,420 मते आहेत. त्यामुळे त्यांना वायएसआर काँग्रेस आणि बिजू जनता दल यांसारख्या पक्षांचा आणि अपक्षांचा पाठिंबा लागणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी आणि महिला प्रवर्गात येणाऱ्या श्रीमती मुर्मू यांनाही ओडिशातील असल्याचा लाभ मिळणार आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही हे स्पष्ट केले आहे. मुर्मू यांचे ट्विटरवर अभिनंदन करताना त्यांनी लिहिले की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली तेव्हा मला खूप आनंद झाला. ओडिशातील लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. मला खात्री आहे की श्रीमती मुर्मू या देशातील महिला सक्षमीकरणाचे ज्वलंत उदाहरण बनतील. राज्यसभेत ओडिशातील 10 पैकी 9 सदस्य, लोकसभेतील सर्व 12 सदस्य बीजेडीचे आहेत. बीजेडीचे विधानसभेत 114 आमदार आहेत, तर एक अपक्ष आणि भाजपचे 22 सदस्य आहेत. अशा प्रकारे 147 सदस्यीय ओडिशा विधानसभेत मुर्मू यांना 137 सदस्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा जाहीर केला

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मूच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. तमांग यांनी सांगितले की त्यांचा पक्ष सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा, एनडीएचा सहयोगी असल्याने, मुर्मूच्या उमेदवारीला बिनशर्त पाठिंबा देईल. आपण विजयी होऊन आदिवासी समाजातून देशाच्या पहिल्या राष्ट्रपती होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
"सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामित करण्याच्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो," असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.