Prime Minister Trophy: टाटा स्टीलला 2016-17 ची पंतप्रधान ट्रॉफी

केंद्रीय स्टील मंत्री बिरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी 2016-17 च्या पंतप्रधान ट्रॉफी प्रदान केली

Updated: Mar 2, 2019, 08:11 AM IST
Prime Minister Trophy: टाटा स्टीलला 2016-17 ची  पंतप्रधान ट्रॉफी  title=

नवी दिल्ली : केंद्रीय स्टील मंत्री बिरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी 2016-17 च्या पंतप्रधान ट्रॉफी प्रदान केली. ही ट्रॉफी आणि प्रमाणपत्र जमशेदपूर वर्क्स आणि टाटा स्टील लिमिटेडला देण्यात आली. यासोबतच संपूर्ण चांगल्या कामासाठी 2 कोटी रुपयांची कॅश देखील यावेळी देण्यात आली. एकीकृत स्टील संयंत्रांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. 

स्टील मंत्रालयातर्फे पंतप्रधान ट्रॉफी आणि स्टील मंत्री ट्रॉफी टाटा स्टीलला देण्यात आली. उत्पादकता, आर्थिक, नवाचार आणि अनुसंधान तसेच विकासाची गती वाढविल्याने टाटा स्टीलचा गौरव करण्यात आला. हे स्टील प्लांट इतर प्लांटच्या तुलनेत आर्थिक रेकॉर्ड आणि उत्पादकतेत अधिक सक्षम राहिले आहे. पंतप्रधान ट्रॉफी सोबत जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडला विजयनगरमध्ये एका उत्कृष्ट कामासाठी स्टील मंत्री ट्रॉफी आणि 1 कोटी रोख असा पुरस्कार देण्यात आला. 

जगामध्ये भारत हा स्टील उत्पादन करणारा दुसरा मोठा देश आहे. 2030-31 पर्यंत कच्चा स्टीलची क्षमता वाढून 300 मिलियन टन ठेवण्याचे लक्ष्य निर्धारित केले गेले असल्याचे या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी सांगितले. घरगूती स्टील ला चालना देण्यासाठी सर्व पाऊले उचलली गेली आहेत. तसेच सोबत काम करणाऱ्यांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

उत्कृष्टता आणि शानदार प्रदर्शनासाठी पुरस्कार देण्याची सुरूवात 1992-93 मध्ये झाली. यावेळी 2016-17 च्या अनुषंगाने पंतप्रधान ट्रॉफीचे हे 25 वे वर्ष होते. याआधीही टाटा स्टीलाल अनेकदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.