नवी दिल्ली : काँग्रेसला नवी संजवणी देण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यासाठी प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रियंका गांधी यांना कार्यकारी अध्यक्ष पद देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
प्रियंका गांधी या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष बनू शकतात असे वृत्त 'डीएनए' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे. दिल्लीत नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये उपस्थित असलेल्या एका सूत्राच्या हवाल्याने 'डीएनए' हे वृत्त दिले आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वर्किंग कमिटीच्या बैठकिच्या शेवटी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काही ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा केल्याचं वृत्तामध्ये म्हटले आहे. सोनिया गांधी यांनी हा प्रस्ताव मांडला असता याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिलेय.
Complete fabrication. No such discussion took place whatsoever:Priyanka Gandhi's PA P Sahay to ANI on reports of her being Cong working Pres
— ANI (@ANI) August 14, 2017
याआधीही प्रियंका गांधी यांना पक्षात महत्वाची भूमिका द्यायला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियंका गांधी यांनी केवळ अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघाच्या बाहेर पडल्या नव्हत्या. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी पक्षाची कमान तरुण नेत्यांकडे द्यायला हवी, अशी काँग्रेसमध्ये मानसिकता आहे.
गेल्या काही निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे प्रियंका यांच्या बाबतच्या बातमीला दुजारो मिळत आहे. काही दिवसांपूर्वी परदेशातील एक निवडणूक सल्लागार भारतात आला होता. तेंव्हा त्याने यूपीएच्या काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. काँग्रेसकडून तो प्रियंका गांधी यांना भेटला होता.