प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांना डेग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 25, 2017, 03:56 PM IST
प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांना डेग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात प्रियांका गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयाचे डॉक्टर डी. एस. राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांना २३ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर अरुप बसू यांच्या देखरेखीत प्रियांका गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण झाली असून आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दिल्लीमध्ये आतापर्यंत डेंग्यूचे ६५७ रुग्ण आढळले. यापैकी दिल्लीतील ३२५ आणि इतर राज्यांतील ३३२ रुग्णांचा समावेश आहे. दक्षिण दिल्ली परिसरात डेंग्यूचे सर्वाधिक म्हणजेच ६४ रुग्ण आढळले आहेत.