'डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी असा कोणता शोध लावला?', प्रसिद्ध व्यक्तीची वादग्रस्त पोस्ट

Dr APJ Abdul Kalam birth Anniversary : 'हे म्हणजे चहा विकणारा माणूस हाच चहाचा संशोधक असल्याचे ढोल पिटणे होय', म्हणत कलामांच्या संशोधनावर कोणी उपस्थित केलाय प्रश्न? एका पोस्टमुळं नव्या वादाला तोंड

Updated: Oct 15, 2022, 12:42 PM IST
'डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी असा कोणता शोध लावला?', प्रसिद्ध व्यक्तीची वादग्रस्त पोस्ट title=
prof Hari Narke wrote controversial post on indias late former president dr apj abdul kalam birth Anniversary

A. P. J. Abdul Kalam : भारताचे माजी राष्ट्रपती आणि 'मिसाईल मॅन' (Missile Man) म्हणून ओळख असणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा (Dr APJ Abdul Kalam birth Anniversary ) आज जन्मदिवस (Birth Anniversary). आज कलाम आपल्यात नाहीत, पण त्यांचे सिद्धांत, तरुणाईला दिलेले संदेश आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा व्यापक दृष्टीकोन आजही अनेकांनाच प्रेरणआ देणारा ठरत आहे. तिथे सोशल मीडियावर बरेचजण कलामांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शिकवणींवर लक्ष केंद्रीत करत असतानाच एका नावाजलेल्या लेखक- प्राचार्यांनी त्यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केली आहे. (prof Hari Narke wrote controversial post on indias late former president dr apj abdul kalam birth Anniversary)

अब्दुल कलामांचा वाचनाशी संबंध काय?, राष्ट्रपती (President) म्हणून त्यांचे देशाला विशेष योगदान काय होते? असे जळजळीत सवाल हरी नरके (prof Hari Narke) यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते. पण त्यांना काही मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं असं म्हणत त्यांनी कोणता शोध लावला?, अशा प्रश्नांचा भडीमार नरके यांनी केला. कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून का साजरा करावा? असा सूर आळवत लेखक नरके यांनी अनेकांच्या नजरा वळवल्या. 

हेसुद्धा पाहा : Positive Video: दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये मोठं सुख! चिमुकलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य जिंकतंय यूजर्स मन

सोशल मीडियावर नरके यांच्या या पोस्टमुळं सध्या एकच खळबळ माजली असून, विविध स्तरांतून यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. 

हरी नरके यांनी पोस्टमध्ये काय लिहिलं? 
'कलामांचा वाचनाशी संबंध काय? प्रा. हरी नरके
विभुतीपुजा आणि दैवतीकरण या मध्यमवर्गाच्या लाडक्या गोष्टी. एखादी व्यक्ती जर हिंदुत्ववादी असेल तर त्या सुमार किंवा B+ श्रेणीतील व्यक्तीचा विशेष प्राविण्य गटात समावेश करून त्याच्या आरत्या ओवळायला मध्यमवर्गाला फार आवडते. उदा. आंबापुत्र किडे गुरुजी म्हणे अणुशास्त्रज्ञ आहेत. उद्या हे मोबाईल मेकॅनिक, स्टो दुरुस्त करणारे, स्कूटर मेकॅनिक यांचाही "शास्त्रज्ञ" म्हणून उदोउदो करतील.

APJ अब्दुल कलाम हे एक इंजिनियर (तंत्रज्ञ, टेक्निशियन) होते. पण त्यांना या मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकले. मला सांगा कलामांनी असा कोणता शोध लावला? मिसाईल बनवणे हे संशोधन नव्हे. ती एक मशीन आहे. तिचा शोध कलामांनी लावलेला नाही. तो जर्मनीत लागला.तेव्हा कलाम पाळण्यात होते. हे म्हणजे चहा विकणारा माणूस हाच चहाचा संशोधक असल्याचे ढोल पिटणे.

कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस का? किती ग्रंथसंग्रह होता कलामांचा? कोणती पुस्तके त्यांनी वाचली होती? ग्रंथसंस्कृती, वाचन संस्कृती यांच्या विकासाला कोणता हातभार त्यांनी लावला? माणूस मुस्लिम असून शंकराचार्यांच्या पुढे लोटांगण घालीत होता, यापलीकडे कलामांचे कला, साहित्य,संस्कृती, वाचन, ग्रंथजगत, यासाठी योगदान काय? त्यांनी गरिबीत दिवस काढले. हे खरेच आहे की त्यांचे आत्मचरित्र वाचनीय आहे. ते सतत प्रकाशझोतात असणारे शासकीय अधिकारी होते. हिंदुत्ववाद्यांचे ते डार्लिंग होते.म्हणून त्यांना भारत रत्न व राष्ट्रपतीपद दिले गेले.

राष्ट्रपती म्हणून त्यांचे देशाला विशेष योगदान काय होते? संसदेच्या प्रांगणात महात्मा जोतीराव फुले यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार होते. तेव्हा कलाम राष्ट्रपती असल्याने त्यांच्या हस्ते ते व्हावे म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिले. कोण महात्मा फुले? असे विचारून त्यांनी या कार्यक्रमाला यायला थेट नकार दिला. त्यांचे वाचन, त्यांचे जनरल नॉलेज इतके थोर होते की त्यांना महात्मा फुले माहीतच नव्हते. ( पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत पार पडले. )