नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल आता समोर आलेत. विजयी उमेदवारांच्या घरी शानदार सेलिब्रेशन सुरू झालंय तर पराभूत उमेदवार धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान एका उमेदवाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ पंजाबचा आहे.
लोकसभा निडवणुकीचा निकाल जाहीर होताना कुणाच्या चेहऱ्यावर आनंद तर कुणाच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत होतं. अर्थातच या उमेदवारालाही पराभवाचं दु:ख झालं होतं... पण, हे दु:ख त्याला जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे नाही तर कुटुंबीयांनी केलेल्या विश्वासघातामुळे झालं.
मीडियासमोर बोलताना हा उमेदवार अक्षरश: हमसून हमसून रडला. या उमेदवाराला लोकसभा निडवणुकीत केवळ पाच मतं मिळाली... पण आपल्या कुटुंबातच ९ सदस्य आहेत, असं सांगताना त्याला आपले अश्रू अडवता आले नाहीत. नीटू शटरा असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे.
पण, या पराभवाचं खापर त्यानं ईव्हीएमवर पोडत या निवडणुकीत नक्कीच काहीतरी काळंबेरं असल्याचा आरोप त्यानं केला.
Iss independent candidate ko total 5 votes padi hain aur iske ghar mein 9 log hain pic.twitter.com/E6f9HJXCYA
— Rishav Sharma (@rishav_sharma1) May 23, 2019
प्रश्न : आपको पांच वोटें ही मिलीं.
उत्तर : सर मेरे घर की नौ वोटें हैं. मुझे पांच पड़ी हैं. (रोते हुए)
प्रश्न : तो क्या परिवार वालों ने वोट नहीं दी?
उत्तर : नहीं सर मेहनत की. पर इलेक्शन में बेईमानी हुई है