पंजाब : घरात कुत्रे, मांजरी पाळणं आता पंजाबमध्ये सशुल्क होणार आहे.
पंजाबच्या पर्यटन खात्याचे मंत्री नवज्योतसिंग सिंधूंच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे पाळीव प्राणी सांभाळणे देशात सशुल्क करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पंजाब सरकारने याविषयी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार नागरिकांना मांजर, कुत्रा, गाय, म्हैस, घोडा, डुक्कर, शेळी, मेंढी, हरिण यांसाऱखे पाळीव प्राणी पाळायचे असतील तर वर्षाला कर भरावा लागणार आहे.
कुत्रा, मांजर, डुक्कर, मेंढी, हरिण यांसारख्या छोट्या प्राण्यांसाठी २५० रुपये प्रतिवर्ष कर भारावा लागणार आहे. म्हैस, बैल, उंट, घोडा, गाय, हत्ती यांसाऱखे प्राणी पाळायचे असतील तर त्यासाठी ५०० रुपये प्रति वर्ष कर भरणं बंधनकारक होणार आहे.
प्रत्येक पाळीव प्राण्याला विशिष्ट ब्रँडिंग कोडही देण्यात येणार आहे. प्राण्यांच्या ओळखीसाठी चिन्ह किंवा क्रमांक देण्यात येणार आहेत. तर काही प्राण्यांच्या शरीरावर मायक्रो चीपही बसवण्यात येणार असल्याचेही पंजाब सरकारने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.