Video: अजगराने कांगारुला घेतलं विळख्यात, शेवटच्या क्षणापर्यंत मित्राने दिली साथ; पण...

व्हिडीओत एका अजगराने कांगारुला आपल्या विळख्यात घेतलेलं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुमच्या अंगावर शहारा येईल. 

Updated: Sep 1, 2022, 02:06 PM IST
Video: अजगराने कांगारुला घेतलं विळख्यात, शेवटच्या क्षणापर्यंत मित्राने दिली साथ; पण... title=

Python Attack Deer Viral Video: सोशल मीडिया म्हंटलं की व्हायरल व्हिडीओंचं (Viral Video) व्यासपीठ. या प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये सर्वाधिक पसंती ही वन्य प्राण्यांच्या व्हिडीओंना दिली जाते. वन्य प्राण्यांची शिकार करण्याची पद्धत आणि जीवनशैली कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका अजगराने कांगारुला (Python Attack On Deer) आपल्या विळख्यात घेतलेलं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुमच्या अंगावर शहारा येईल. पण कांगारुच्या मित्राने शेवटपर्यंत साथ सोडली नाही आणि जीव वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही कांगारुच्या धाडसाचे कौतुक कराल. एक विशालकाय अजगर हरणाची शिकार करताना दिसत आहे. पण तेवढ्यात कांगारूचा मित्र येतो आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. इतकंच नाही तर आपल्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी ताकद एकवटतो. पहिल्यांदा खाली दिलेला व्हायरल व्हिडीओ पाहा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इतके प्रयत्न करूनही अजगराने पकडलेल्या कांगारूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ पाहताना अनेकांचे डोळे पाणावले आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून लाइक केला आहे. तसेच कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.