दोन महिन्यात राहुल गांधीच्या फॉलोअर्समध्ये १० लाखांची वाढ

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. गेल्या दोन महिन्यात राहुल गांधीच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत १० लाखांनी वाढलीये.

Updated: Sep 24, 2017, 03:01 PM IST
दोन महिन्यात राहुल गांधीच्या फॉलोअर्समध्ये १० लाखांची वाढ title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. गेल्या दोन महिन्यात राहुल गांधीच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत १० लाखांनी वाढलीये.

काँग्रेस सूत्रांच्या मते जुलै २०१७मध्ये राहुल यांचे फॉलोअर्स साधारण २४.९३ लाख होते. यात सप्टेंबरमध्ये ३४ लाखांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, याबाबतीत राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या खूप मागे आहेत. पंतप्रधान मोदींचे ट्विटरवर २.१ कोटी फॉलोअर्स आहेत. 

ट्विटरवर राहुल गांधींचे फॉलोअर्स वाढत असले तरी फेसबुकवर मात्र तितकेसे त्यांचे चाहते नाहीत. तीन महिन्यांपूर्वीच राहुल गांधीचे फेसबुक पेज व्हेरिफाय झाले. त्यांचे फेसबुकवर १३.६३ लाख फॉलोअर्स आहेत.