बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनिकला गेले होते, आरजेडीची टीका

राहुल गांधीवर टीकेनंतर काँग्रेसचं उत्तर

Updated: Nov 16, 2020, 10:45 AM IST
बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनिकला गेले होते, आरजेडीची टीका title=

पटना : बिहार निवडणुकीच्या निकालानंतर महाआघाडीने काँग्रेसवर टीका केली आहे. महाआघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसच्या निकृष्ट कामगिरीमुळे आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, बिहारमधील निवडणुकांच्या वेळी राहुल गांधी शिमल्यात बहीण प्रियंकाच्या घरी पिकनिकला गेले होते. दरम्यान, बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिल कुमार शर्मा यांनी महाआघाडीचे सरकार न बनल्यामुळे काँग्रेसला दोष देणे योग्य नाही असे म्हटले आहे. २०००, २००५, २०१० या वर्षात काँग्रेसशी युती नव्हती, मग राष्ट्रीय जनता दलाला पूर्ण बहुमत का मिळाले नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

आरजेडी नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी राहुल गांधी हे त्यांची बहीण प्रियंका गांधी यांच्या शिमला येथील घरी गेले होते. काँग्रेस ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे. ते भारतीय जनता पक्षाला मदत करीत आहेत.

काँग्रेसचा पलटवार 

बिहारमधील महाआघाडीचा पराभव झाल्यावर, राजद नेते शिवानंद तिवारी आणि डाव्या पक्षांनी बिहारमध्ये सत्ता न आल्याने काँग्रेसच्या खराब कामगिरीला दोषी ठरवलं आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI ML), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माकप) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM) यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. पण आता काँग्रेस पक्षानेही काउंटर हल्ला सुरू केला आहे.

टीकेला उत्तर देताना बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिल शर्मा यांनी रविवारी तीन स्वतंत्र ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. अनिल शर्मा म्हणाले की, आरजेडी विशेष मताचे राजकारण करते. म्हणून, अगदी सुरुवातीपासूनच संपूर्ण बिहारी समाजाचा लोकप्रिय पाठिंबा त्यांना मिळाला नाही. महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभेचे उदाहरण देताना ते म्हणाले की, आरजेडी उच्चवर्णीय आरक्षणाला विरोध करीत होती. निवडणुकीत विशिष्ट वर्गाविरूद्ध सामाजिक द्वेषाबद्दल बोलल्यामुळे मोठे नुकसान झाले.'

आरजेडीला आत्मपरीक्षण सल्ला

अनिल शर्मा यांनी मित्रपक्ष आरजेडीला सल्ला दिला की, 'काँग्रेसवर टीका करण्याऐवजी आत्मपरीक्षम करावे, भविष्यात बसपासारखी रननीती बदलून बहुजन समाजाऐवजी सर्व समाजासाठी राजकारण केले पाहिजे.'