नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी पक्ष मुख्यालयात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तब्बल १६ वर्षे अध्यक्षपद सांभाळल्यावर कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्या यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे सोपवली. सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारताना राहुल गांधी जितके भाऊक तितकेच उत्साहपूर्ण भावमुद्रेत दिसत आहेत.
#WATCH live from AICC: Rahul Gandhi takes charge as the President of Congress party in Delhi. https://t.co/3N6Ot5Prpt
— ANI (@ANI) December 16, 2017
राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारत असताना सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, गुलाम नभी आझाद, यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक प्रमुख नते व्यासपीठावर उपस्थित आहेत.
#WATCH Live via ANI FB from AICC: Rahul Gandhi takes charge as the President of Congress party in Delhi https://t.co/3mo97GEPcV pic.twitter.com/EOVa0BRBoF
— ANI (@ANI) December 16, 2017
भारतीय राजकारणातील प्रदीर्घ काळाचा साक्षीदार असलेल्या असलेल्या कॉंग्रेस या ऐतिहासिक पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी स्वीकारत आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे. राहुल गांधी तो कसा सांभाळतील याबाबत कॉंग्रेसच नव्हे तर, देशासह जगभरातील राजकीय जाणकारांना उत्सुकता आहे.
#FLASH Rahul Gandhi takes charge as Congress President, handed over the certificate for taking over. pic.twitter.com/DQW9q76zEv
— ANI (@ANI) December 16, 2017