मुंबई : रेल्वे प्रवास करताना तुम्हांला तिकीट तपासनीसाला अधिकृत ओळखपत्र दाखवणं सक्तीचे आहे.
अशावेळेस आधारकार्ड किंवा पॅनकार्ड याची फोटोकॉपी आणि मूळपत्र तुमच्यासोबत आठवणीने ठेवणं गरजेचे होते. पण तुमचा रेल्वेप्रवास थोडा सुकर करण्यासाठी आता m-Aadharची सोय करण्यात आली आहे.
आधार कार्ड मोबाईल अॅपच्या स्वरूपात सादर करणे म्हणजेच m-Aadhar. या सोयीला आता रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.
Ministry of Railways permits m-Aadhar as one of the prescribed proofs of Identity for rail travel purpose.
— ANI (@ANI) September 13, 2017
m-Aadhar या मोबाईल अॅपच्या माध्यमातून कोणीही आपले आधार कार्ड डाऊनलोड करु शकते. आधार क्रमांकाशी जो मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आला आहे त्या मोबाईल क्रमांकावर हे अॅप वापरण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान, ओळखपत्राची मागणी केल्यानंतर प्रवाशाला आपल्या मोबाईलमधील हे अॅप ओपन करून त्यामध्ये पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर या अॅपमध्ये आधार कार्ड ओपन होईल. हे आधार कार्ड अधिकृत ओळखपत्राचा पुरावा म्हणून दाखवता येऊ शकणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे