गुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत

तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 3, 2017, 12:03 PM IST
गुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत title=

नवी दिल्ली : तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.

यावर्षीपासून आयआरसीटीसीने तात्काळ तिकिटांचे ऑनलाईन  बुकिंग सोपे करण्यासाठी 'पे-ऑन डिलिव्हरी' ही सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. आता तिकिटांसाठी होम डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध असेल. तसेच बुकिंग केल्यानंतर कॅश, डेबिट या क्रेडिट कार्डने तुम्ही तिकिटांचे पैसे देऊ शकता.  आयआरसीटीसी या योजनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.

 आयआरसीटीसी कंपनीने दावा केला की, तात्काळ तिकीट काढताना पैसे देण्याची समस्या दूर करण्यासाठी ही सेवा उपलब्ध केलेय. तसेच प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळण्याची जास्त शक्यता वाढेल. आरआरसीटीसी दररोज जवळपास १ लाख ३० हजार तिकीट बुकिंग करते. यात अधिकत्तर तात्काळ तिकिटांचा समावेश असतो.

असा मिळेल 'पे ऑन डिलिव्हरी' चा लाभ

- प्रवाशांना irctc.payondelivery.co.in वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड माहिती देणे आवश्यक.
- आता, आयआरसीटीसी पोर्टल पर बुकिंगच्या वेळी, यूजरला Anduril तंत्रज्ञानच्या 'पे-ऑन डिलिव्हरी'चा विकल्प निवडावा लागेल.
- तिकीट काढल्यानंतर एसएमएस / ई-मेलद्वारे ते प्रवाशाला मिळेल. तसेच 24 तासांच्या आत पेमेंट करणे आवश्यक आहे.
- शिवाय ग्राहक ऑनलाइन पेमेंट देखील करु शकतात. यासाठी त्यांनी एक पेमेंट लिंक पाठवावी लागेल.