वृद्ध दाम्पत्याला लोअर बर्थ न देणं पडलं महागात, रेल्वेला 3 लाखांचा दंड

 रेल्वेला तीन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश 

Updated: Apr 2, 2021, 11:47 AM IST
वृद्ध दाम्पत्याला लोअर बर्थ न देणं पडलं महागात, रेल्वेला 3 लाखांचा दंड  title=

नवी दिल्ली : कर्नाटकात वयोवृद्ध जोडप्यास रेल्वेला लोअर बर्थ न देणे रेल्वेला महागात पडले. जिल्हा ग्राहक मंचाने रेल्वेला तीन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने देखील (NCDRC) रेल्वेची याचिका फेटाळली.

रेल्वेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिव्यांग वृद्ध प्रवाशांची विशेष काळजी घेण्याविषयी सांगितले जाते. पण बर्‍याच वेळा रेल्वे कर्मचारी या नियमांकडे दुर्लक्ष करतात. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वृद्ध आणि दिव्यांग जोडप्यांला लोअर बर्थ दिले नाही. तसेच गंतव्यस्थानापूर्वी सुमारे 100 कि.मी. आधी सोडले.

दुर्लक्ष आणि सेवेअभावी रेल्वेला जबाबदार धरत जिल्हा ग्राहक मंचने रेल्वेला 3 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) रेल्वेची याचिका फेटाळून लावत जिल्हा ग्राहक मंच व राज्य ग्राहक मंचाचा आदेश कायम ठेवला आहे. दैनिक जागरणने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

ही घटना 4 सप्टेंबर 2010 रोजी कर्नाटकात घडली होती. या जोडप्याने अपंग व्यक्ती असल्याने सोलापूरहून बिरुरला जाण्यासाठी थर्ड एसी मधील दिव्यांग कोट्यातून एक जागा आरक्षित केली होती. त्यांना रेल्वेकडून लोअर बर्थ देण्यात आले नाही. या जोडप्याने टीटीईला लोअर बर्थ देण्याची विनंती केली पण त्यांनी लोअर बर्थ दिले नाही. एका प्रवाशाने त्याला त्याचा खालचा बर्थ दिला, परंतु सीट न मिळेपर्यंत ते अस्वस्थ झाले.

कोचमध्ये 6 लोअर बर्थ रिक्त असूनही टीटीईने त्यांना लोअर बर्थ दिले नाही. बिरुर स्थानकात आम्हाला उतरायच असेही दाम्पत्याने सांगितले. पण टीटीईने त्याआधी 100 किलोमीटर चिकजाजूरमध्येच त्यांना उतरवले. यामुळे या दाम्पत्याला नाहक त्रास झाला.