संतापजनक| लग्नानंतर 2 महिन्यात महागड्या स्मार्टफोनसाठी पत्नीला विकलं

कहर| महागड्या मोबाईलसाठी बायकोलाचं विकलं, कुठे घडलाय हा संतापजनक प्रकार

Updated: Oct 23, 2021, 05:01 PM IST
संतापजनक| लग्नानंतर 2 महिन्यात महागड्या स्मार्टफोनसाठी पत्नीला विकलं

राजस्थान: आपला महागडी इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क एका व्यक्तीनं आपल्या पत्नीलाच विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या पैशातून त्याने महागडा स्मार्टफोन विकत घेतल्याची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीने 2 महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं. आपल्या पत्नीला 2 लाख रुपयांना विकल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे. 

अल्पवयीन मुलीला त्याने 1 लाख 80 हजार रुपयांसाठी एका वृद्ध व्यक्तीला विकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आरोपी व्यक्तीनं या पैशांमधून महागडा स्मार्टफोन खरेदी केला. 

राजस्थानमध्ये लग्नाच्या 2 महिन्यानंतर पत्नीला 55 वर्षीय व्यक्तीला पैशांसाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 17 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी किशोर ओडिसा इथल्या बोलांगीर जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

आरोपी तरुणाने पत्नीला आर्थिक स्थिती बिकट असल्याचं सांगितलं. इतकच नाही तर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिला काम करुया असं सांगून तिला राजस्थानमधील एका गावात घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याचं खरं रुप समोर आलं. 

काही दिवस या दोघांनीही नोकरी केली. मात्र अखेर आरोपीने त्याच्या पत्नीला 55 वर्षीय वृद्ध व्यक्तीला 1 लाख 80 हजार रुपयांना विकलं. त्याने मिळालेले पैसे मजा करण्यासाठी उडवल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीने पत्नीच्या घरी जाऊन बोंबाबोंब केली. ती घरातून पळून गेल्याचा दावाही केला. मात्र घरच्यांनी त्याच्यावर विश्वास न ठेवता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. 

पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीनं या तपासातील मोठा दुवा हाती लागला. त्यांनी किशोरचीही चौकशी केली मात्र त्याने सारवासारव करत उत्तरं दिली. 17 वर्षीय किशोरला सध्या सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर या मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आलं आहे.