Hit and Run : रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना थारने चिरडलं, भाऊ-बहिण आणि आईचा मृत्यू

Hit and Run Case : देशात हिट अँड रन प्रकरणात कमी होतना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आली आहे. एका थारने रस्तान ओलांडणाऱ्या तिघांना चिरडलं. यात तिघांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 11, 2024, 08:19 PM IST
Hit and Run : रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना थारने चिरडलं, भाऊ-बहिण आणि आईचा मृत्यू title=

Hit and Run Case : Hit and Run Case : देशात हिट अँड रन प्रकरणात कमी होतना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आली आहे. एका थारने रस्तान ओलांडणाऱ्या तिघांना चिरडलं. यात तिघांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजस्थानमधल्या जयपूरमध्ये (Jaipur) ही दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबाती आई आणि भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला. महिला आपल्या दोन मुलांसह रस्ता ओलांडण्यासाठी उभी होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी चालकाला अटक केली असून थार गाडी जप्त केली आहे. 

धडकेत तिघांचा मृत्यू
राजस्थानची राजधानी जयपूरच्या मानसरोवर परिसरात ही घटना घडली वेगाने येणाऱ्या थार गाडीने तिघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात एका महिलेसह तिची अडीच वर्षांची मुलगी आणि 10 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. थार चालवणाऱ्या आरोपीचं नाव विपिन सैनी इसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चालक लोकेशबरोबर गाडीत आणखी एक व्यक्ती होती. 

तिन्ही मृत एकाच कुटुंबातील
रस्ता ओलांडण्यासाठी ही महिला रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी हा अपघात घडला. टेक ओव्हर करण्याच्या नादात थार चालकाने महिला आणि तिच्या दोन मुलांना जोरदार धडक दिली. तिघंही जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना पाहून आरोपी चालक घटनास्थळावरुन फरार झाला. पण पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटजेच्या मदतीने आरोपीला अटक केली. चालकाने मद्यप्राशन केलं होतं का याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

पुण्यातही हिट अँड रन
दरम्यान पुण्यातही हिट अँड रनची घटना घडली आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागात एका अलिशान कारनं रौफ शेख या डिलिव्हरी बॉयला चिरडलं. मध्यरात्री दीडच्या सुमारास एका धनदांडग्यानं भरधाव कार चालवून अनेक वाहनांना धडक दिली. इतरांना किरकोळ दुखापत झाली पण रौफ शेख दुर्दैवी ठरला. अपघातानंतर पळून गेलेल्या आयुष तयाल याला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. एका कंपनीत मॅनेजर असलेल्या आयुषला मध्यरात्री पुण्यात दारु कुणी दिली याचाही पोलीस शोध घेतायत.

या प्रकरणात मुंडवा पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही तपासत गाडीच्यां नंबर वरून शोध घेत दोन तासात अपघातातील गाडी आणि कारचालकाला अटक केली. पोलिसांच्या तपासात कारचालक आयुष तयाल हा नशेत असल्याचे समोर आले आहे .

पुण्यात दारु पिऊन वाऱ्याच्या वेगानं कार पळवणाऱ्या श्रीमंतांच्या पोरांची संख्या वाढलीय. अपघातही वाढलेत. हिट अँड रनच्या घटना पाहता पुण्यातल्या रस्त्यांवर चालावं की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडलाय.