Exclusive: '...म्हणून अमितसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला', राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

Raj Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंना (Amit Thackeray) भांडुप (Bhandup) मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी होत असतानाही माहीम (Mahim) मतदारसंघातून उमेदवारी का देण्यात आली? याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.     

शिवराज यादव | Updated: Nov 10, 2024, 03:06 PM IST
Exclusive: '...म्हणून अमितसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला', राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा title=

Raj Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंना (Amit Thackeray) भांडुप (Bhandup) मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी होत असतानाही माहीम (Mahim) मतदारसंघातून उमेदवारी का देण्यात आली? याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला आहे. तसंच अमित ठाकरेंना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय कसा झाला? हेदेखील त्यांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली. महायुतीने पाठिंबा देण्याच्या निर्णयासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले. मी ज्यावेळी निवडणुका लढवणार असं जाहीर  केलं तेव्हा ते मला पाठिंबा देतील त्यावर लढणार असं तर नव्हतं. माझं काम मी केलं. 

"आदित्यच्या बाबतीत जे मी केलं त्याला चांगली कृती असं म्हणतो. माझे तिथे मतदार असतानाही आमच्या कुटुंबातील एक मुलगा तिथे उभा राहत आहे, मला वाटलं म्हणून मी तिथे उमेदवार दिला नाही. मी काही कोणाला फोन नव्हते केले की, मी आज तुम्हाला पाठिंबा देत आहे नंतर मला द्या. आमितचं नाव जाहीर झालं तेव्हा मी त्यांना असं सांगितलं नव्हतं की तुम्ही मला पाठिंबा देणार असाल तर अमितचं नाव टाकतो. मी असं न करता अमितचं नाव जाहीर केलं. तुम्हाला वाटत असेल तर नका टाकू, नसेल वाटत तर टाका. मी त्याच्यासाठी थांबलो नव्हतो," असं राज ठाकरे म्हणाले. 

Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं

Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले

एकनाथ शिंदे यांनी तुम्ही विश्वासात घेतलं नसल्याचं म्हटल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, "मी त्यांना का विश्वासात घेऊ. ते जे काही जाहीर कऱणार होते तेव्हा मला विश्वास घेतलं होतं का? हा विश्वासाचा भाग नाही. हा आपल्या संबंधांचा, चांगुलपणचा भागआहे. मला वाटतं ती गोष्ट माझ्यकाडे आहे ती मी केली. हे प्रश्न त्यांना विचारायला हवेत". 

अमित ठाकरेंना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय कसा झाला याचा खुलासा करताना त्यांनी सांगितलं की, "पक्षाचे नेते, सरचिटणीस यांची बैठक झाली. अमित ठाकरेंनी प्रत्येक नेत्या, पदाधिकाऱ्याने निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे असं म्हटलं. त्यावर बाळा नांदगावकरांनी कोण उभं राहणार असं विचारलं होतं. त्यावर अमित उद्या जर पक्ष बोलला तर मीदेखील उभा राहीन असं बोलून गेला. त्याच्या बातम्या आल्या, पण त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही". 

Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?

पुढे त्यांनी सांगितलं, "माझी बैठक सुरु होती. त्यात एक दोनजण आपण अमितला भांडुपमधून उभं करु असं सांगत होते. त्यावेळी माझे अँटिना उभे राहिले, हे काहीतरी गंभीर प्रकऱण दिसत आहे असं लक्षात आलं. याचं कारण मी ज्या विचारात वाढलो तिथे निवडणुका लढवणं असं काही नाही. जर माझ्या मुलाच्या डोक्यात तसं येत असेल तर हे प्रकरण काय आहे असा विचार सुरु झाला. मी आणि शर्मिला त्याच्यासोबत बसलो. मला लोक सांगत आहेत की तुला भांडुपमधून उभं करा, तुला खरंच निवडणूक लढवायची आहे का? असं विचारलं. त्यावर त्याने तू जर सांगत असशील तर मी तयार आहे असं तो म्हणाला. त्यावर मी तू मानसिकरित्या तयार आहेस का? असं विचारलं,  त्याला निवडणूक लढणं फार सोपी गोष्ट नसते हेदेखील सांगितलं". 
 
"मी म्हटलं इथे तीन-चार पक्ष येतील त्यातून निवडणूक लढशील. त्यावर तो हो म्हणाला. मी त्याच्याबरोबर एकही बैठकीत थांबलो नव्हतो. माझ्या तीन, चार बैठकी झाल्या होत्या. तो खरंच तयार आहे का हे जाणून घ्यायचं होतं. नंतर हा तयार आहे असं लक्षात आलं. मग जर त्याला उभं करायचं आहे तर जिथे तो जन्मला, वाढला, आसापासचा परिसर माहिती आहे, लोक माहिती आहेत, जागा माहिती आहे अशा ठिकाणी उभं राहावं असा विचार आला," असा खुलासा राज ठाकरेंनी केला. 

तुम्ही काही सल्ले दिलेत का? असं विचारलं असता त्यावर ते म्हणाले, "मी काही सल्ले दिलेले नाहीत. तो तयार असेल तर त्याने विचार केला असेल. मी चार गोष्टी सांगून वैचारिक गोंधळ घालू इच्छित नाहीत. उद्या वाटलं तर काही गोष्टींचा सल्ला देईन. तुलना तर होणारच आहे, म्हणून कोणी थांबावं असं नाही. बाळासाहेबांनी, माझ्या वडिलांनी आम्हाला कधी परावृत्त केलं नाही. जे वाटतं तरे करा असं सांगितलं. मी मुलांच्या बाबतीत तसाच आहे. त्याला जर उभं राहायचं असेल तर उभं राहावं".