नवी दिल्ली : भाजपा ला गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुर्ण बहूमत मिळाले आहे.
यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, "आमच्या आशेनुसार निकाल लागला आहे. आम्ही दोन्ही राज्यात पुर्ण बहूमत प्राप्त करून सत्तेवर आलो आहे."
विधानसभेचा हा निकाल पाहता पंतप्रधान मोदींवर लोकांचा विश्वास आहे का ? असे विचारताच राजनाथ म्हणाले, "हा नक्कीच. हा मोदींच्या विकास कार्यावर लोकांची आस्था आहे. त्याचबरोबर हे यश देखील मोदी सरकारच्या कामाचा परिणाम आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात भाजप सत्तेवर येणार आहे."
भाजपचे नेते प्रकाश जावडेकरांचे देखील असेच मत आहे.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री यांनी सांगितले की, "सध्या राजकारणाचा मंत्र विकास आहे. त्यामुळे जनता मोदींसोबत आहे."