SPG : सुरक्षा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

 सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक)  (SPG (Amendment) Bill) राज्यसभेत (Rajya Sabha) मंजूर करण्यात आले आहे.  

Updated: Dec 3, 2019, 05:37 PM IST
SPG : सुरक्षा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर title=

नवी दिल्ली : सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक)  (SPG (Amendment) Bill) राज्यसभेत (Rajya Sabha) मंजूर करण्यात आले आहे. या विधेयाकाल काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला. हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडेल. काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आवाजी मतदानाने सुरक्षा एसपीजी विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. हे विधेयक मंजूर झाल्याने यापुढे केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. आता माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही, हे या नव्या विधेयकामुळे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, गांधी घराण्याची सुरक्षा हटविण्यात आल्यानंतर मोदी सरकारवर जोरदार टीका झाली. याआधी लोकसभेत सुरक्षा सुधारणा विधेयक मंजूर झाले होते. ते आज राज्यसभेतही मांडण्यात आले. या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी गांधी घराण्यावर टीका केली. हे विधेयक केवळ एका कुटुंबाच्या हितासाठी आणण्यात आलेले नाही, असे शाह म्हणाले. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षा का हटवण्यात आली, असा सवाल काँग्रेसने केला होता. यावर उत्तर देताना ते म्हणालेत, गांधी कुटुंबीयांची सुरक्षा हटवण्यात आलेली नाही, तर ती बदलण्यात आली आहे. 

माजी पंतप्रधानांचे एसपीजी कव्हर देखील मागे घेण्यात आले आहे. नरसिंह राव, चंद्रशेकर, आय.के. गुजराल, मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांची सुरक्षा काढण्यात आली आहे. लोकशाहीमध्ये कायदा प्रत्येकासाठी समान असतो, एखादे कुटुंब नाही, केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.