रामराजे शिंदे, नवी दिल्ली : देशभरातील रामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२३ अखेर पर्यंत राम भक्तांसाठी राम मंदिर (Ram Mandir) दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या सदस्यांची नुकतीच अयोध्येत बैठक झाली. ही बैठक ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
२०२३ पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल तर २०२५ पर्यंत संपूर्ण ७० एकर परिसर तयार होणार आहे. राम मंदिराचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी दोन शिफ्ट मध्ये काम केले जात आहे. यापूर्वी २०२४ पर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु नंतर २०२३ अखेर पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले.
रामभक्तांना रामलल्लाचे दर्शन मिळण्यासाठी काही दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे. अयोध्येत ( Ayodhya ) ट्रस्टची बैठक पार पडली. मंदिराचे बांधकाम आता दोन शिफ्टमध्ये सुरू केले आहे. २०२३ ला राम मंदिर तर २०२५ पर्यंत ७० एकर परिसर तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.