राम रहिमची बॅग उचलली, डेप्युटी अॅडव्होकेट जनरल निलंबित

बाबा राम रहिम यांची बॅग उचलल्याप्रकरणी डेप्युटी अॅडव्होकेट जनरल गुरूदास सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. 

Updated: Aug 26, 2017, 10:34 PM IST
राम रहिमची बॅग उचलली, डेप्युटी अॅडव्होकेट जनरल निलंबित title=

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना २ साध्वींचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. मात्र याच बाबा राम रहिम यांची बॅग उचलल्याप्रकरणी डेप्युटी अॅडव्होकेट जनरल गुरूदास सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. 

शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर बाबा राम रहिम यांची बॅग डेप्युटी जनरल गुरूदास सिंह उचलत होते आणि ही दृश्ये कॅमेरात कैद झाली आहेत त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आता डेप्युटी अॅडव्होकेट जनरल गुरूदास सिंह हे त्यांना बाबा राम रहिम यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांची बॅग उचलताना दिसले. त्याचमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

राम रहिम यांना शिक्षा सुनावली जाऊ शकते, बलात्कार आणि लैंगिक शोषणाप्रकरणी बाबा राम रहिम यांना कमीत कमी ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.