पंजाब, हरियाणासह पंचकुला परिसरात तणावपूर्ण शांतता

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर  सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे  समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 26, 2017, 09:58 PM IST
पंजाब, हरियाणासह पंचकुला परिसरात तणावपूर्ण शांतता title=

पंचकुला : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर  सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे  समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

राम रहिमला महिलेवरील बलात्कारप्रकरणी सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलंय. या प्रकरणी २८ ऑगस्टला शिक्षा सुनावली जाणा आहे. निकालानंतर रामरहिमला अटक करुन चंडीगडला नेण्यात आलं. तिथून हेलिकॉप्टरनं रोहतकला नेण्यात आलं. 

दरम्यान सीबीआय कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हजारोंच्या संख्येत जमलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. यात ३६ जणांचा बळी गेलाय तर २५० हून  अधिक जण जखमी झालेत.

तर शीरसाचे डीसीपी अशोक कुमार यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या नुकसानीची भरपाई बाबा राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाकडून करण्यात यावी असे आदेश पंजाब-हरियाणा हायकोर्टानं दिले आहेत. दरम्यान आज डेरा सच्चा या मुख्यालयावर आज लष्कर आणि रॅपीड एक्शन फोर्सच्या वतीने संचनल करण्यात आलंय.  

दरम्यान, मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा घेऊन हरयाणामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.