नवे राष्ट्रपती कोविंद यांचा अल्प परिचय

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव करत १४वे राष्ट्रपती होण्याचा मान पटकावला. कोविंद हे कोण आहेत, त्याचा अल्प परिचय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 20, 2017, 06:10 PM IST
नवे राष्ट्रपती कोविंद यांचा अल्प परिचय title=

नवी दिल्ली : एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव करत १४वे राष्ट्रपती होण्याचा मान पटकावला. कोविंद हे कोण आहेत, त्याचा अल्प परिचय.

रामनाथ कोविंद मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. 

रामनाथ कोविंद कोळी जातीचे असून उत्तर प्रदेशात या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला जातो. 

पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. 

रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला.  त्यानंतर १९९४ मध्ये कोविंद यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. 

रामनाथ कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता. 

पक्षाचा दलित चेहरा म्हणून ते पक्षाचे प्रवक्ते राहिले आहेत. ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. 

भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली आहे.

अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.