रांचीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; १२ जणांना अटक

सहाजणांनी शस्त्राचा धाक दाखवून तिचे अपहरण केले.

Updated: Nov 29, 2019, 11:01 PM IST
रांचीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; १२ जणांना अटक title=

रायपूर: झारखंडच्या रांचीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रांची शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही विद्यार्थिनी बसस्टॉपवर आपल्या मित्रासह उभी होती. त्यावेळी सहाजणांनी शस्त्राचा धाक दाखवून तिचे अपहरण केलं आणि जवळच्याच एका गावात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या सहाजणांनी तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आपल्या आणखी सहा साथीदारांना घटनास्थळी बोलावले. त्यांनीही या तरुणीवर अत्याचार केले. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ विशेष तुकडी तयार करून तपासाला सुरुवात केली. पीडितेने पोलिसांना आरोपींबद्दल माहिती दिली. 
याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन हत्यारे, बंदुकीच्या गोळ्या आणि मोबाईल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनेकजण भाजी विक्रेते आणि गवंडी आहेत.