पंचतारांकीत हॉटेल्स, स्मार्ट सिटींनाही लाजवेल असा राम रहीमचा डेरा

बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीम दोषी आढळला आणि कायद्याने त्याची मान पकडली. त्यानंतर त्याच्या अनेक गोष्टींचा भांडाफोड होऊ लागला. त्याच्या डेरा सच्चा सैदामध्ये असलेल्या विविध सुविधा पाहून तर, अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या डेरामध्ये पंचतारांकीत आणि स्मार्ट सिटी संकल्पनेत असतात त्याला तसूभरही कमी नसणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 27, 2017, 12:23 PM IST
पंचतारांकीत हॉटेल्स, स्मार्ट सिटींनाही लाजवेल असा राम रहीमचा डेरा title=

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीम दोषी आढळला आणि कायद्याने त्याची मान पकडली. त्यानंतर त्याच्या अनेक गोष्टींचा भांडाफोड होऊ लागला. त्याच्या डेरा सच्चा सैदामध्ये असलेल्या विविध सुविधा पाहून तर, अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या डेरामध्ये पंचतारांकीत आणि स्मार्ट सिटी संकल्पनेत असतात त्याला तसूभरही कमी नसणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

बाबा गुरमीत राम रहीमच्या सिरसा येथील डेरा सच्चा सौदामध्ये द शायनिंग मॅजिक ग्रॅंड रिसॉर्ट, मनोरंजनासाठी विशेष पार्क, चित्रपट गृहे, पेट्रोल पंप, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स, आयटी कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल्स, गर्ल्स कॉलेज, अद्ययावत ग्रंथालये, मासिके आणि स्वत:चे चॅनेलही आहे. राम रहीम याचे एसएमजी हे रिसॉर्ट तर, म्हणे जगातल्या सातव्या आश्चर्यासारखेच आहे. सांगण्यात येते की, हे रिसॉ़र्ट पाण्याखाली आहे. याच्या तिसऱ्या मजल्यावर ५९ खोल्या आहेत. हेल्थ क्लब, स्पा क्लब अशा सुविधाही येथे उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर, या ५९ खोल्यांपैकी एखाद्या खोलीत तुम्हाला रहायचे असेल तर, प्रति खोली ९ हजार किंवा त्याहून अधिक रूपये मोजायची तुम्हाला तयारी ठेवावी लागते.

या सर्वांशिवाय २३ एकर जागेवर एमएसजी गावही वसविण्यात आले आहे. 'एनबीटी'ने दिलेल्या वृत्तानुसार, या गावात  आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, टेनिस लोन (क्ले कोर्ट आणि सिंथेटीक कोर्टसह), रोलर स्केटींग स्टेडियम, फुटबॉल, हॅंडबॉल,  व्हॉलीबॉल, हॉकी, बास्केटबॉल, नेटबॉल, जिम्नॅस्टिक, गन शूटींग यांसारख्या खेळांसाठी अत्यंत अद्ययावत स्टेडियमच्याही सुविधा  देण्यात आल्या आहेत. या डेरामध्ये आध्यात्मीक गोष्टींसाठी एक सत्संग हॉलही उभारण्यात आला आहे. जो काहीशे स्वेअर फुटांमध्ये विस्तारलेला आहे. या हॉलमध्ये एकाच वेळी काही लाख लोक बसू शकतात. इतकेच नव्हे तर, या आश्रमात हेलिकॉप्टरच्या लॅंडींगसाठी हेलिपॅडही उभारण्यात आले आहे. ज्यावर केवळ राम रहीम यांचे किंवा तशाच एखाद्या व्हिव्हिआयपी व्यक्तीचे हेलिकॉप्टर उतरू शकते.

बाबांना कारचाही भारी शौक. बाबा राम रहीम यांच्याकडे मर्सडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, लेक्सस, टोयोटा यांसारख्या गाड्यांचा तर, खजीनाच आहे. या खजीन्यात महागड्या स्पोर्ट बाईक्स आणि त्यांच्या देकभालीसाठी अद्यायावत गॅरेजही आहे.