धक्कादायक! आधी बलात्कार नंतर गर्भपात, आरोपीने गाठली क्रौर्याची परिसीमा

तरूणीवर आधी बलात्कार नंतर गर्भपात करताना मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर

Updated: Aug 15, 2022, 09:33 PM IST
धक्कादायक! आधी बलात्कार नंतर गर्भपात, आरोपीने गाठली क्रौर्याची परिसीमा title=

Crime News : जबरदस्तीने गर्भपात करताना बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित तरूणी 22 वर्षांची होती. गर्भपातावेळी तिचा मृत्यू झाला (Abortion death) असून डॉक्टरांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधील चोलापूर पोलीस स्टेशनच्या परिसरातील ही घटना आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण? 
पीडित तरुणी चोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात तिच्या मामाच्या घरी शिकत होती. तिथे तिची ओळख वाहन चालक प्रद्युम्न यादव याच्याशी होते. काही दिवसात प्रद्युम्न तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो. प्रद्युम्न पीडित तरूणीवर बलात्कार करतो.

पीडित तरूणी गर्भवती राहते परंतु कोणाला समजत नाही. मात्र पाच महिन्यांनंतर तरूणी गरोदर असल्याचं प्रद्युम्नला समजतं. त्यानंतर तो औषध देण्याच्या बहाण्याने तरूणीला खासगी रुग्णालयात नेतो आणि बळजबरीने तिचा गर्भपात करतो. यामध्ये तिची प्रकृती बिघडली तेव्हा आरोपी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेतो मात्र त्या रूग्णालयामध्ये पीडितेचा मृत्यू होतो. 

दरम्यान, मुलीच्या मामांनी पोलिसामध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी चार जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रद्युम्न यादव आणि रूग्णालयाचे संचालक शीला पटेल यांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. तर फरार अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.