मुंबई : Ration Card Update | केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) अनेक राज्यांच्या गव्हाच्या कोट्यात बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून, शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात पूर्वीपेक्षा कमी दराने गहू मिळेल.
Centre Cuts Wheat Quota Under PMGKAY:तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढवला आहे.
अनेक राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना पूर्वीपेक्षा कमी गहू मिळणार आहे.
PMGKAY अंतर्गत 25 राज्यांच्या कोट्यात कोणताही बदल नाही
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी केला आहे. PMGKAY अंतर्गत बिहार, केरळ आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांना मोफत वितरणासाठी गहू दिला जाणार नाही.
याशिवाय दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. उर्वरित 25 राज्यांच्या कोट्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदळातून
केंद्राने राज्यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 'मे ते सप्टेंबर या उर्वरित 5 महिन्यांसाठी सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या PMKGAY वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितले की, गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदळातून केली जाईल.